महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

क्रॉफर्ड मार्केटमधील आगीवर नियंत्रण.. मुंबईतील दुकानांसाठी नवीन गाईडलाईन ठरवणार : महापौर

crawford market fire breaks out mumbai
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग

By

Published : Jun 11, 2020, 6:39 PM IST

Updated : Jun 11, 2020, 10:41 PM IST

22:07 June 11

क्रॉफर्ड मार्केट आगीवर नियंत्रण, कुलिंग ऑपरेशन सुरू

मुंबई - सुप्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमधील काही दुकानांना आज (गुरुवारी) सायंकाळी आग लागली. या आगीवर मुंबई अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान आगीच्या घटना टाळता याव्यात, यासाठी दुकानांसाठी वेगळी गाईडलाईन ठरवण्यात येईल. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास दक्षिण मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानांना आग लागली. सुरुवातीला ही आग चार ते पाच दुकानांना लागल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या दुकानात असलेले पुठ्याचे बॉक्स, पॅकिंग मटेरियल, परफ्युम आदी वस्तूंमुळे आग पसरत गेली. मार्केटमधील 12 दुकाने आणि त्यांच्या पोटमाळ्यावर आग पसरली.

आगीत पुठ्याचे बॉक्स, पॅकिंग मटेरियल, इलेक्ट्रिक सामान, वायरिंग जळून खाक झाले आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या ६ फायर वाहन, ५ वॉटर टँकर व १ रेसक्यू वाहनाने घटनास्थळी जाऊन आगीवर 8 वाजून 48 मिनिटांनी नियंत्रण मिळवले. आगीमुळे धूर झाल्याने दुकानांची शटर तोडून आग विझवावी लागली असून आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. 

अशी असेल नवीन गाईडलाईन....

क्रॉफर्ड मार्केटमध्ये फळ, परफ्युम, ड्रायफ्रुट, गिफ्टची दुकाने आहेत. ही दुकाने अगदी दाटीवाटीने आहेत. मार्केटमध्ये ही सर्व दुकाने दाटीवाटीने असल्याने पुठ्ठे, लाकडी सामान यामुळे आग पसरली. यापुढे आग लागू नये म्हणून आग लागतील अशी लाकडाचे पुठ्याचे सामान असलेली व परफ्युम विकणारी एका बाजूला असतील; अशा गाईडलाईन ठरवली जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

20:48 June 11

क्रॉफर्ड मार्केट आग प्रकरणानंतर आता दुकानांसाठी वेगळी गाईडलाईन ठरवावी लागेल; महापौरांची प्रतिक्रिया

महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया...

मुंबई - क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानांना आग लागल्यानंतर एकाच ठिकाणी विविध वस्तुंची दुकाने असल्याने ही आग धुमसत राहिली. सकृत दर्शनी ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचे दिसत आहे. तसेच क्रॉफर्ट मार्केचच्या या घटनेनंतर आता दुकानांसाठी वेगळी गाईडलाईन ठरवावी लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील काही दुकानांना आज (गुरुवार) सायंकाळी आग लागली. या ठिकाणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी दुकानांसाठी वेगळी गाईडलाईन ठरवावी लागेल, असे सांगितले आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील तळ मजल्यावरील दुकानांना आग लागली होती. ती आग पोट माळ्यापर्यंत पोहचली होती. त्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले आहे. मात्र, जोपर्यंत आग विझत नाही तोपर्यंत आमचे जवान याच ठिकाणी असतील, असेही महापौर म्हणाल्या आहेत.

क्रॉफर्ड मार्केटमधील चार ते पाच दुकानांना आग लागली होती. सध्या दुकाने बंद आहेत. मात्र, या ठिकाणी लाकडाची पुठ्याची आणि परफ्युमची दुकाने एकाच ठिकाणी आहेत. यामुळे दुकानांचे शटर तोडून अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्याचे काम करावे लागत आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये, म्हणून लाकडाची, पुठ्याची आणि परफ्युमची दुकाने एकाच ठिकाणी नसावीत. यासाठी गाईडलाईन ठरवावी लागेल, असे महापौरांनी सांगितले.

20:13 June 11

क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण

क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण

मुंबई - शहरातील क्रॉफर्ड मार्केट येथील काही दुकानांना सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची तसेच या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केट मधील काही दुकानांना आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ फायर वाहन, ५ वॉटर टँकर आणि १ रेसक्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी 3 ते 4 दुकानांना आग लागल्याचे निदर्शनास आले आहे. आगीमुळे निर्माण झालेला धूर जास्त असल्याने काही दुकानांचे शटर तोडावे लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

18:36 June 11

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग

मुंबई - क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत. आग लागल्यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात परिसरात पसरले आहेत.

हेही वाचा..."आला रे आला..." मान्सूनचे दक्षिण कोकणात आगमन

मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. ज्या परिसरात आग लागली आहे तो कॉफर्ड मार्केटचा अत्यंत दाटीवाटीचा आणि गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी अत्यंत छोट्या गल्ल्यांमध्ये दुकाने आहेत.

Last Updated : Jun 11, 2020, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details