मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियोजित सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले ( Nationalist Congress Party cancels all programs ) आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री नेत्यांनी गर्दी होणारे कार्यक्रम करू नयेत, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार) घेतलेल्या बैठकीमध्ये ( NCP Leader Sharad Pawar Instruction ) करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यामध्ये असलेल्या करुणा परिस्थितीचा आढावा तसेच मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा शरद पवार यांच्याकडून घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी माहिती दिली.
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नको! -
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. थोड्याच दिवसात राज्यामध्ये महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील असेही बैठकीत चर्चा झाल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.