मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी), दहिसर चेक नाका तसेच बोरिवली, कांदरपाडा येथे 'कोविड केअर केंद्र' उभारण्यात येत आहे.
दहिसर आणि बोरिवलीमध्ये कोविड केअर केंद्र उभारणार; प्रशासन सज्ज - corona in mumbai
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून प्रशासनाने त्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी), दहिसर चेक नाका तसेच बोरिवली, कांदरपाडा येथे 'कोविड केअर केंद्र' उभारण्यात येत आहे.
पश्चिम उपनगरातील बाधितांची वाढती संख्या पाहता कोविड कक्ष उभारण्याची मागणी म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी केली होती. दहिसर जकात नाका येथे 800 ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था असणार आहे. तर बोरिवली आरटीओ कार्यालयाजवळील कांदरपाडा येथे डायलिसीस सुविधा असणाऱ्या 220 बेडचे अतिदक्षता विभाग उभारणार आहेत. याबाबत एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेले हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून येत्या दोन आठवड्यांत ते पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी वर्तवली आहे.
शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली. यावेळी मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी, राजू इंदुलकर उपस्थित होते. राज्य सरकारने शहरातील विविध विभागांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सूचना दिल्या आहेत. यामध्ये विलगीकरण आणि अलगीकरण केंद्र अंतर्भूत असावे, असे ते म्हणाले.