मुंबई - १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण पासून सुरू केले आहे. त्यासाठी नऊ जम्बो कोविड सेंटर सध्या सुरू केले आहे. लवकरच लसीकरण केंद्रांचा या आठवड्यात प्रतिसाद पाहून विस्तार करू. प्रत्येक सेंटरमध्ये ५ बूथ आहेत. किमान पाचशे युवकांचे ट्रान्सलेशन होईल अशी व्यवस्था आहे. मुलांना आपण कोव्हाक्सींन देत आहे. दोन डोसमधील 28 दिवसांचे अंतर असेल. 9 लाख जण आहेत. 28 दिवसात त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा मानस आहे. सहा दिवस लसीकरण केंद्र सुरू राहणार असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
Vaccination For 15 to 18 : आजपासून राज्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात; पाहा कुठे काय परिस्थिती - लहान मुलांचे लसीकरण
12:28 January 03
लसीकरण केंद्रांचा या आठवड्यात प्रतिसाद पाहून विस्तार करू - सुरेश काकाणी
12:26 January 03
मनमाड फ्लॅश
आजपासून 15 ते 18 वर्षापर्यंत मुलांना लसीकरणाला सुरवात झाली असून, मनमाड उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र आहे. नांदगांवच्या ग्रामीण भागात 4 अतिरिक्त केंद्र असून, जवळपास 16 हजारापेक्षा जास्त लाभार्थी संख्या आहे.
12:23 January 03
नंदुरबारमध्ये लसीकरण झाले सुरू
वाढत्या कोरोना रुग्णसंख्याच्या सावटाखाली आज पासुन 15 ते 18 वयोगटातील लसीकरण झाले सुरू
15 ते 18 वयोगटातील 94129 जणांच्या लसीकरणाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.
त्यासाठी जिल्ह्याभरात तब्बल 10 ठिकाणी करण्यात आली आहे सोय..
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील जेपीएन रुग्णालायातुन होणार लसीकरण शुभारंभ
सध्या जिल्ह्यातील ॲक्टीव्ह कोरोना बाधीतांची संख्या 15 वर
11:57 January 03
कोल्हापूर - जिल्ह्यात 2 लाख 29 हजार मुलांचे होणार लसीकरण
कोल्हापूर - पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 2 लाख 29 हजार लाभार्थ्यांचा समावेश आहे. या वयोगटातील मुलं आता शाळा तसेच महाविद्यालय सुरू झाल्याने अनेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊनच लसीकरण सुरू झाले आहे. कोल्हापूर शहरात या वयोगटातील तब्बल 28 हजार मुलं आहेत. या सर्वांचे देखील लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हे लसीकरण सध्या सुरू झाले आहे.
11:27 January 03
पुण्यात 40 केंद्रावर लसीकरणाला सुरूवात
पुणे -केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेच्या हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरणाला (Pune Vaccination) सुरवात झाली आहे. शहरात आज 15 ते 18 वयोगटासाठी 40 केंद्रावर लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर अडीचशे लस दिली जात आहे यात 50% ऑफलाईन तर पन्नास टक्के ऑनलाईन आहे.
10:29 January 03
9 केंद्रावर केले जाणार लसीकरण
- भायखळा आर.सी. कोविड लसीकरण केंद्र
- सायन सोमय्या जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- वरळी एनएससीआय डोम, जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- बांद्रा बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र एच / प
- गोरेगाव नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- कांजूरमार्ग क्रॉम्प्टन अँड ग्रीव्ह्स जम्बो लसीकरण केंद्र
- मुलुंड आर सी जम्बो कोविड लसीकरण केंद्र
09:19 January 03
मुंबईत 9 ते 5 वाजेपर्यंत 15 ते 18 वर्षे मुलांना मिळणार लसीकरण
मुंबई - सोमवारपासून पालिकेने मुंबईमधील 9 केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लहान मुलांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून पालकांनी आपल्या मुलांचे नाव कोविन ऍपवर नोंद करूनच लसीकरण केंद्रावर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे