मुंबई - शहरात गुरुवारी कोरोनाचे नव्याने 478 रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 4232 वर पोहचला असून आतापर्यंत 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत गुरुवारी आढळले कोरोनाचे नवे 478 रुग्ण, 8 जणांचा मृत्यू - 478 new patients in Mumbai, total raise to 4232
मुंबईतील कोरोनाबाधित नव्या रुग्णांची संख्या 478 वर पोहोचली आहे. आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 4232 वर पोहचला आहे.
![मुंबईत गुरुवारी आढळले कोरोनाचे नवे 478 रुग्ण, 8 जणांचा मृत्यू COVID 19 Update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6915915-277-6915915-1587664987116.jpg)
मुंबईमध्ये आज 48 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 473 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 478 रुग्ण आढळले. यामधील 181 रुग्ण गेल्या 24 तासात पॉझिटिव्ह आले आहेत. 20 व 21 एप्रिलला खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेल्यापैकी 297 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या 24 तासात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 5 जणांना इतर आजारही होते. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येते. मुंबईत सध्या असे 92 हजार 112 होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 हजार 807 जणांनी होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे.