मुंबई - कोरोना विषाणूचे भारतात ६० हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईत २ तर, नागपुरात १ नवीन रुग्ण आढळला असून राज्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर गेली आहे. २ दिवसांपूर्वी पुण्यात आढळलेल्या २ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६ जणांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी मुंबईतील दोघा सहप्रवाशांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांच्या रक्ताच्या चाचण्या पुन्हा केल्या जात असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात अली आहे.
चीनमधील वुहान प्रांतात आढळून आलेला कोरोना विषाणू जगभरात पसरला आहे. यामुळे आत्तापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाची बाधा झालेले ११ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ८ जणांवर पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नव्याने आढळलेल्या दोन जणांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या त्या दोन जणांना विलगीकरण कक्षात इतर संशयित रुग्णांपासून वेगळे ठेवले जाणार आहे. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या पुन्हा करण्यात आल्या आहेत. त्याचे रिपोर्ट येत्या काही तासात येतील, असे पालिका प्रशासनानाने कळविले आहे. तर, नागपुरातही एका ४५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिकेची यंत्रणा सज्ज -
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात २८ बेडची व्यवस्था असून ‘कोरोना’ रक्त चाचणीही करण्यात येत आहे. शिवाय आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेच्या महत्त्वाच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार ठेवला आहे. याचबरोबर ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सज्ज ठेवले असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्या -