मुंबई -मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या घरगुती हिंसाचार खटला रद्द करणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आले होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना झटका दिला असून याचिका फेटाळून लावली आहे. (Domestic Violence Lawsuit On Hemant Nagrale) नगराळे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये घरगुती (Petition of Hemant Nagarale in the Supreme Court) हिंसाचार खटला तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्द करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हेमंत नगराळे यांना न्यायालयातून कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
चार महिन्यांपासून देखभाल खर्च देखील देण्यात आला नाही
नगराळे यांच्या पहिली पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात देखभाल खर्च, तसेच पुणे नागपूर या ठिकाणी राहण्याची सोय करून देण्यात यावी या मागणीकरिता मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. (Hemant Nagarale and wife case) चार महिन्यांपासून देखभाल खर्च देखील देण्यात आला नाही. यासाठी देखील न्यायालयात युक्तिवादा दरम्यान सांगण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नगराळे यांना त्वरित पुढील सुनावणीपर्यंत त्यांचा 4 महिन्यांचा देखभाल खर्च देण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे.