महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माजी मंत्री नवाब मलिक यांना किडनीची टेस्टसाठी न्यायालयाची परवानगी - मलिक यांना किडनीची टेस्टसाठी न्यायालयाची परवानगी

नवाब मलिक यांनी किडनीची टेस्ट (kidney test of ex minister Nawab Malik) करण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये अर्ज केला होता. या अर्जाला आज न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना खाजगी रुग्णालयात आता किडनीची टेस्ट करता येणार आहे. रेनल स्कॅन RENAL SCAN टेस्टमुळे किडनी किती कार्यक्षमतेने कार्यरत आहे हे स्पष्ट होते.

नवाब मलिक यांच्या किडनीची टेस्ट करण्याकरिता न्यायालयाची परवानगी
नवाब मलिक यांच्या किडनीची टेस्ट करण्याकरिता न्यायालयाची परवानगी

By

Published : Sep 7, 2022, 9:35 PM IST

मुंबई - माजी मंत्री नवाब मलिक यांनी किडनीची टेस्ट करण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये अर्ज केला होता (kidney test of ex minister Nawab Malik). या अर्जाला आज न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना खाजगी रुग्णालयात आता किडनीची टेस्ट करता येणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून नवाब मलिक यांच्यावर कुर्लातील खाजगी रुग्णालयातील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये न्यायालयाच्या परवानगीने उपचार सुरू आहेत.


रेनल स्कॅन -नवाब मलिक यांना रेनल स्कॅन RENAL SCAN टेस्ट करण्याची कोर्टाने दिली परवानगी दिली आहे. मुंबई सत्र न्यायालयात विशेष पी एम एल ए न्यायधीश आर एन रोकडे यांनी अर्ज मंजूर केला आहे. मलिक यांना 12 सप्टेंबर रोजी घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयात टेस्टसाठी घेऊन जाण्याचे संबंधित प्रशासनाला निर्देश दिले आहेत. मागील महिन्यात मलिक यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यांना तेव्हा इतर अनेक त्रास होते. म्हणून सदर टेस्ट करता आली नव्हती. रेनल स्कॅन टेस्टमुळे किडनी किती कार्यक्षमतेने कार्यरत आहे हे स्पष्ट होते.


टेरर फंडिंगअसल्याचा आरोप -गोवावाला कंपाउंड खरेदी आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोप ईडीने केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी सक्त वसुली संचालनालयाने नवाब मलिक यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने त्यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.



नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप - नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

For All Latest Updates

TAGGED:

RENAL SCAN

ABOUT THE AUTHOR

...view details