महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस; ३० दिवसांत हजर राहण्याचे आदेश - परमबीर सिंह न्यूज

परमबीर सिंह(param bir singh) यांच्या जुहू येथील घरावर फरार असल्याची नोटीस(Param Bir Singh absconding order) लावली आहे. मरीन लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत खंडणी प्रकरणात सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित करण्यात आले आहे.

Param Bir Singh
परमबीर सिंह नोटीस

By

Published : Nov 23, 2021, 2:51 PM IST

Updated : Nov 23, 2021, 3:08 PM IST

मुंबई -माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(param bir singh) यांच्या जुहू येथील घरावर फरार असल्याची नोटीस लावली आहे. मरीन लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत खंडणी प्रकरणात सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित करण्यात आले आहे.

पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित(Param Bir Singh absconding) केले आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत दिली आहे. 30 दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.

परमबीर सिंह यांच्या घराबाहेर लावलेली नोटीस
  • 30 दिवसात हजर राहण्याचे आदेश -

सध्या फरार घोषित असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच असल्याचे समोर आले आहे. स्वतः परमबीर सिंह यांच्या वकिलांनी याबाबत न्यायालयाला सोमवारी माहिती दिली. महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने परमबीर सिंह समोर येत नाहीत. पुढील ४८ तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर न्यायालयात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता.

  • ...तर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया -

मुंबई गुन्हे शाखेतर्फे (Mumbai Crime Branch) सिंह यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर मुंबईच्या एस्प्लेनेड न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस हे आता फरार गुन्हेगार म्हणून घोषित करू शकतात. त्यानंतर ते जर पोलिसांसमोर हजर झाले नाही तर पोलीस त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील, अशी माहिती विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी दिली.

  • परमबीर सिंह यांच्याविरोधात वॉरंटही जारी करण्यात आले होते -

परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. तर, सिंह सध्या गायब असून न्यायालयातही ते हजर राहत नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांना समन्स देखील बजावण्यात आला होता. मात्र, काहीही प्रत्युत्तर न आल्याने त्यांच्याविरोधात वॉरंटही जारी करण्यात आले होते.

Last Updated : Nov 23, 2021, 3:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details