मुंबई -सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात ( Mumbai City Bank Scam ) शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ ( Shivsena Leader Anand Adsul ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका आज सोमवार (दि.31) रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही पक्षकारांकडून आज युक्तिवाद पूर्ण झाला. या अटकपूर्व जामिनावर न्यायालयाने आज निकाल न देता 9 फेब्रुवारी रोजी निकाल देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आनंदराव अडसूळ यांना ( Anand Adsul Pre Arrest Bail Result ) दिलासा मिळतो की अटक होते, हे महत्त्वाचं असणार आहे.
काय आहे प्रकरण -
आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना 'ईडी'ने समन्स पाठवलं होतं. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ‘ईडी’ने त्यांना ताब्यात घेतलं.