महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Coronavirus New Cases Today : देशामध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, 24 तासांत आढळले 16167 नवे रुग्ण - कोरोनाव्हायरस नवीन केस

Coronavirus New Cases Today : आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 16 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

Coronavirus New Cases Today
Coronavirus New Cases Today

By

Published : Aug 8, 2022, 10:25 AM IST

मुंबई -आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Corona Cases) व्हायरसची लागण झालेल्या 16167 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच सक्रिय रुग्णांच्या (Active Cases) संख्येत घट झाली असून ही संख्या 1,34,933 वर पोहोचली आहे. काल देशात 18738 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच, केवळ 24 तासांतच बाधितांचा आकडा वाढून 16 हजारांवर पोहोचला आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 5,26,530 वर येऊन पोहोचली आहे.

मुंबईत रविवारी ४६५ नवे कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू - मुंबईत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. त्यात वाढ होऊन बुधवारी ४३४, गुरुवारी, ४१०, शुक्रवारी ४४६, शनिवारी ४८६ तर आज रविवारी ४६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २३२ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत - राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2734 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 2924 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1017 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 182, रायगड 242, रत्नागिरी 72, सिंधुदुर्ग 66, सातारा 115, सांगली 183, कोल्हापूर 143, सोलापूर 158, नाशिक 484, अहमदनगर 320, जळगाव 45, धुळे 58, औरंगाबाद 205, जालना 41, बीड 67, लातूर 197, परभणी 29, हिंगोली 35, नांदेड 102, उस्मानाबाद 170, अमरावती 110, अकोला 37, वाशिम 104, बुलढाणा 54, यवतमाळ 82, नागपूर 1175, वर्धा 94, भंडारा 334, गोंदिया 143, गडचिरोली 82 आणि चंद्रपूरमध्ये 147 सक्रीय रुग्ण आहेत. या ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 12011 सक्रिय रुग्ण सध्या आहेत.

राज्यात 1812 कोरोना रुग्णांची नोंद - राज्यात आज 1812 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1675 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय - राजधानी नवी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांच्या पुढे आढळत आहेत. त्यामुळे दिल्लीकरांच्या पुन्हा एकदा चिंतेत वाढ झाली आहे. रविवार दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत राजधानी दिल्लीमध्ये 2423 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Three Women Died In Stampede : मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर एकादशीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, तीन महिलांचा मृत्यू

हेही वाचा -Dahanoo Forcible conversion : डहाणूत जबरदस्तीने धर्मांतरणाचा डाव उधळला; चार मिशनरींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details