महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

literary conference : प्रथमच देशातील संस्कृत, तामिळ, मराठी साहित्य संमेलन मुंबईत - Sanskrit Tamil Marathi literary conference

मुंबई महानगरात ( Mumbai Metropolis ) 23 वर्षे झालं कोणत्याही संमेलन झालेलं नाही अखिल भारतीय इतर भाषेतील त्यामुळे तब्बल 23 वर्षानंतर मुंबईत संमेलन होत आहे आणि तेही मराठी त्यामुळे संस्कृत भाषिकांचं एकत्रित हे संमेलन होत आहे.

literary conference
साहित्य संमेलन मुंबईत

By

Published : Oct 12, 2022, 1:08 PM IST

मुंबई :मुंबई महानगरात ( Mumbai Metropolis ) 23 वर्षे झालं कोणत्याही संमेलन झालेलं नाही अखिल भारतीय इतर भाषेतील त्यामुळे तब्बल 23 वर्षानंतर मुंबईत संमेलन होत आहे आणि तेही मराठी त्यामुळे संस्कृत भाषिकांचं एकत्रित हे संमेलन होत आहे. 15 आणि 16 ऑक्टोंबर दोन दिवस हे साहित्य संमेलन सुरू असणारा असून महाराष्ट्रातील कन्नड, तामिळ, बंगाली आणि संस्कृत या भाषेतील ज्येष्ठ श्रेष्ठ कवी लेखक नाटककार याचांही सहभागी होणार आहेत. देशामध्ये फक्त हिंदी भाषेतूनच व्यवहार व्हावा या विचाराला दक्षिण भारतातून प्रखरपणे विरोध सुरू असताना त्या पार्श्वभूमीवर विविध भाषिक संमेलन महाराष्ट्रात हे रंगतदार ठरणार यात शंका नाही.

साहित्य संमेलन मुंबईत


मराठीचा दक्षिण भारतातल्या भाषेवर प्रभाव :राज्यातील मराठी साम्राज्याचा विस्तार दक्षिणेत तंजावर पर्यंत झाला होता. त्यामुळे आपल्या मराठी चालीरीती आणि संस्कृतीचा प्रभाव मिलाफ हा दक्षिणेतल्या अनेक भाषांसोबत तिथल्या संस्कृती सोबत झालेला आहे. त्याचं जिथे जागत उदाहरण म्हणजे शेकडो, हजारो मराठी शब्द तामिळ कन्नड, तेलगू या भाषांमध्ये आढळतात. त्यामुळेच महाराष्ट्रातील साहित्यिक विश्वनाथ खैरे यांनी संकल्पना मांडली होती की मराठी तमिळ आणि संस्कृत असे एकत्रित साहित्य संमेलन झाल्यास एक नवीन परंपरा त्यातून पुढे होऊ शकेल आणि तामिळ मराठी आणि संस्कृत या भाषेचं आदान प्रदान अधिक होईल.


मराठी शाळा बंदी निर्णयाच्या संदर्भात होणार चर्चा :संमेलनाच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मराठी शाळा ज्या आता बंद होत आहेत त्यावर विशेष चर्चा आयोजित केलेली आहे. तसेच महात्मा फुले यांच्या जन्माला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महान ग्रंथ की ज्याला जागतिक अर्थतज्ज्ञ व्यक्तींनी गौरवलेला आहे. असा प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाला शंभर वर्षे पूर्ण होत आहे म्हणून या आणि तामिळ भाषिक महान कविता यांच्या काव्याबद्दल देखील विशेष चर्चा केली जाणार आहे.


तमिळ महान कवींची तुलना प्लॅटो आणि बायबलची केली जाते :महान मानवतावादी तमिळ भाषेतील संत आणि साहित्यिक कवी तिरुवल्लुवर, ज्यांना तिरुवल्लुवर किंवा वल्लुवर देखील म्हणतात. ज्यांचा काळ इ.स.पूर्व १ले शतक किंवा इसवी सन ६वे शतक भारत, असा आहे. तमिळ कवी-संत, तिरुक्कुरल पवित्र युगल चे लेखक म्हणून ओळखले जाणारे, मानवी विचारांचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. तिरुवल्लूर यांच्या रचनेची तुलना बायबल शी केली जाते. तसेच जगातील प्रख्यात तत्त्वज्ञ प्लेटोच्या विचारांशी देखील केली जाते. त्यांच्या काव्यावर आणि जीवन कार्यावर देखील खास चर्चा या संमेलनात होणार आहे.



विविध भाषा विविध संस्कृती एकत्र नांदणे हेच खरे भारताचे वैभव :या संमेलनाचे आयोजक तामिळ, भाषिक शैक्षणिक संस्थेचे अर्ध्वयु जेष्ठ नेते वरदराजन यांनी ई टीव्ही भारतला सांगितले की, या संमेलनामध्ये एक विशेष म्हणून एकाच वेळेला तीन सभागृहात संवाद परिषद सुरू राहतील. एका सभागृहाला कवी तिरुवल्लूर दुसऱ्या सभागृहाला नाव महात्मा फुले आणि तिसऱ्या सहभागृहांना डॉक्टर आंबेडकर असे नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तमिळ भाषेतील आजचे प्रख्यात प्रगतिशील साहित्यिक कारन कारखी यांची खास या ठिकाणी उपस्थित असेल. विविध भाषा त्यांची सांस्कृतिक अस्मिता त्यांची स्वायत्तता जपणे आणि आपले शिक्षण देखील मातृभाषेतून होणे ही काळाची गरज असं त्यांनी नमूद केलं.


मराठी तामिळ कन्नड बंगाली उर्दू हिंदी संस्कृत अशी साहित्यिकांची मांदियाळी :या संमेलनाचे संयोजक महेश भारती यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले. माध्यम आणि लोकशाही या विषयावर औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे तर संस्कृत साहित्याच्या संदर्भात मुंबई विद्याच्या विद्यापीठातील डॉक्टर सुचित्रा ताजणें या संस्कृत साहित्याच्या संदर्भात महाराष्ट्रातील स्त्री विचार यावर साहित्य प्रवास उलगडणार आहेत. तर तमिळ भाषेतील प्रख्यात कवयित्री पुथया माधवी यांची मुलाखत डॉक्टर स्मिता करंदीकर तमिळ कविता आणि काळा किल्ला' या अनुषंगाने घेणार आहेत. या रीतीने पाच ते सात भाषेतील साहित्यिक आपले साहित्य आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर भाष्य मांडणार आहेत.


ABOUT THE AUTHOR

...view details