मुंबई - माटुंग्यातील नामांकित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (आयसीटी) या अभिमत विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला होता. यात आता मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघानेही उडी घेत आयसीटीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - आयसीटी - भ्रष्टाचार
मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाकडून करण्यात आलेले आरोप हे संपूर्ण खोटे आहेत. आम्ही त्यांच्या कर्मचारी संघाला विद्यापीठाकडून मान्यता न दिल्याने ते आमची बदनामी करत आहे, अशी माहिती आयसीटीचे डायरेक्टर भास्कर थोरात यांनी दिली.

मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाकडून करण्यात आलेले आरोप हे संपूर्ण खोटे आहेत. आम्ही त्यांच्या कर्मचारी संघाला विद्यापीठाकडून मान्यता न दिल्याने ते आमची बदनामी करत आहे. त्यांच्या या कृतीमुळे देशातील नामवंत विद्यापीठाचे नाव खराब होत आहे. कर्मचारी संघाकडून करण्यात आलेले आरोप हे धादांत खोटे असून, विद्यापीठाचा कारभार हा पारदर्शक आहे. तसेच कर्मचारी संघाशी आमचा काही संबंध नाही, असे वक्तव्य डायरेक्टर भास्कर थोरात यांनी केले.
कर्मचारी संघाला आमच्या विद्यापीठात यायचे आहे. पण ते येथे येऊ शकत नाही. त्यामुळे ते काही लोकांना भडकावून आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. काही विद्यार्थी आमच्या विरोधात बोलत आहेत. त्यांच्या आणि मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या विरोधात आम्ही अब्रुनुकसानीचा दावा करणार आहोत, अशी माहिती थोरात यांनी दिली.