मुंबई -मुंबईमध्ये एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना मुंबई महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसणे, ऑक्सिजन नसणे, पाणी नसणे आदी प्रश्नावर आज राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान आणि रुग्णांनी सहायक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यामुळे पालिका सज्ज असल्याचा दावा फोल असल्याचे उघड झाले आहे.
पालिकेचा दावा फोल
मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार कमी होत असतानाच कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरू झालेला आहे. मुंबईत रोज 9 ते 11 हजार रुग्ण आढळून येत आहेत. यासाठी पालिकेने आपल्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध केल्या असून खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे.