मुंबई - आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Corona Cases) व्हायरसची लागण झालेल्या 16047 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच सक्रिय रुग्णांच्या (Active Cases) संख्येत घट झाली असून ही संख्या 1,28,261 वर पोहोचली आहे. काल देशात 12,751 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच, केवळ 24 तासांतच बाधितांचा आकडा वाढून 16 हजारांवर पोहोचला आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 5,26,530 वर येऊन पोहोचली आहे.
मुंबईत मंगळवारी कोरोनाचे ४७९ नवे रुग्ण - मुंबईत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. त्यात वाढ होऊन बुधवार पासून रोज ४०० च्या वर रुग्णांची नोंद होत आहे. आज मंगळवारी ४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २६७ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
४७९ नवे रुग्ण - मुंबईत गेल्या २४ तासात ६,५८० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४७९ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे. ३२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २८ हजार ४३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ५ हजार ६४६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३,१२७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १८५७ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३८ टक्के इतका आहे.