मुंबई - देशात आज 19893 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. तर 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 22742 रुग्णांना घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. तर 136478 सक्रिय रुग्ण आहेत. आणि सकारात्मकता दर 0.31 टक्के इतका आहे.
दिल्लीमध्ये पुन्हा कोरोनाचा फैलाव - राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेय. मागील 24 तासांत राजधानी दिल्लीमध्ये 2 हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेटमध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 2 हजार 73 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक हजार 437 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 400 वर-मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ ( Increase in the number of corona virus patients ) झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. आज त्यात वाढ होऊन ४३४ रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २१९ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.