मुंबई - देशात आज 20279 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. तर 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 20,726 रुग्णांना घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. तर 1,52,200 वर सक्रिय रुग्ण आहे. आणि सकारात्मकता दर 4.46 टक्के इतका आहे.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ - राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज राज्यात 2515 नव्या रुग्णांची (Corona Update) भर पडली आहे तर 2449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत रुग्णसंख्या स्थिर - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २६६ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २०० बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विदेशातील स्थिती - मागील 24 तासांत 21 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 60 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 1 लाख लाख 49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 21 हजार 219 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 31 लाख 71 हजार 653 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशात एकूण 5 लाख 25 हजार 930 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावला आहे.भागाकडून देण्यात आली आहे.