मुंबई - देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या 2 दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मागील 2 दिवस देशात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याची नोंद झाली होती. ( Coronavirus New Cases )पण आज पुन्हा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ( Covid19 Updates ) देशात गेल्या 24 तासांत 21 हजार 566 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
दिवसभरात 18 हजार 294 रुग्ण कोरोनामुक्त -देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काल कोरोनाने 40 रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 25 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ( Covid19 Updates ) सध्या देशात 1 लाख 48 हजार 881 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
मुंबईत बुधवारी २९० नवे कोरोना रुग्ण, १ मृत्यूची नोंद-मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २९० रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २५९ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.