मुंबई -केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाऊनचा विस्तार केल्यानंतर मुंबईसह राज्यातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये आणि १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये असल्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे राज्यात दारू विक्रीला इतक्यात परवानगी मिळणार नाही, असे चित्र होते. पण महसूल मिळवण्यासाठी राज्यात दारू विक्री सुरू करावी अशी भूमिका सरकारने घेतली. त्यानुसार आज राज्यात रेड झोनसह सशर्त दारू विक्रीला सुरुवात होणार आहे. मात्र, राज्यात काही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात दुकानांपुढे गर्दी तर काही भागात दुकानांना टाळे असल्याचे दिसत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत दुकाने सुरु असणार आहेत.
हेही वाचा...राज्यातील कंटेनमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू होणार
नाशिक, पुणे, मुंबई या भागात दारू विक्रीला परवानगी आहे. रेड झोन असूनही त्यातील कंटेनमेंट झोन वगळता दारू विक्री करता येणार आहे. या भागात सकाळपासूनच दारुच्या दुकानांबाहेर ग्राहकांनी हजेरी लावली होती.
नागपूरात बंदी तरिही सकाळी दुकाने उघडली :
नागपूर शहर हे ‘रेड झोन’मध्ये असल्याकारणाने येथे कुठलीही शिथिलता राहणार नसल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले होते. असे असतानाही येथील काही भागात सकाळी दारूच्या दुकांनांचे सिल उघडण्यात आले असल्याचे दिसून आले.
परभणी :
परभणी जिल्ह्यात 10 मे पर्यंत लॉकडाऊनचे सर्व नियम कायम राहणार आहेत. यामुळेच जिलह्यातील दारूची दुकाने देखील बंद राहतील. तेव्हा येथील मद्यपींना दारूसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
नांदेड :
नांदेड जिल्ह्यात देखील परभणी प्रमाणे लॉकडाऊनचे आणि पूर्वीचेच सर्व नियम कायम राहणार आहे. येथे कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही.
सोलापूर :
सोलापूरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथे केंद्राच्या नियमाप्रमाणे 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
भंडारा :
भंडारा जिल्हाधिकारी यांनी सध्या कोणतेही नवीन आदेश काढले नसल्याने सोमवारी सकाळपर्यंत सर्वच दारूची दुकाने सील लावलेली पहायला मिळाली आहेत.
अकोला :