महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#coronavirus : लॉकडाऊनच्या काळात मुंबईत तब्बल 10 हजाराहून अधिक नागरिकांवर कारवाई - mumbai police

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्या तब्बल 10,408 नागरिकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

Mumbai police action during lockdown
लॉकडाऊनच्या काळात मुंबईत तब्बल 10 हजारहून अधिक नागरिकांवर कारवाई

By

Published : Apr 29, 2020, 8:58 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या तब्बल 10,408 नागरिकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा...''इरफानच्या जाण्याने एक किंमती हिरा हरवला''

मुंबई शहरात संचारबंदीसह कलम 144 लागू करण्यात आले आहे. असे असतानाही मुंबईत संचारबंदीचा कायदा मोडण्याच्या 5,456 प्रकरणात 10,408 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पोलीस आणखीन 1,234 फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 2,661 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर 6,513 जणांना जामीनावर सोडण्यात आले आहे.

मागील चोवीस तासात मुंबई शहरात 111 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे. अवैद्य वाहतूक या प्रकरणी दक्षिण मुंबईत 8 गुन्हे, मध्य मुंबईत 56 गुन्हे, पूर्व मुंबईत 1 गुन्हा, पश्चिम मुंबईत 34 गुन्हे आणि उत्तर मुंबईत 12 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

हेही वाचा...राज्यातील शाळांची फी वाढ रोखा... माजी शिक्षण मंत्र्यांचे विद्यमान शिक्षण मंत्र्यांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details