महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#coronavirus : लॉकडाऊनमध्ये वकिलांचेही हाल; अ‌ॅड. दीपक पाईकराव यांनी केली एक लाखाची मदत - वकिलांवर लॉकडाऊन इफेक्ट

लॉकडाऊनचा फटका अनेक वकिलांनाही बसला आहे. विक्रोळी न्यायालयात अनेक नवखे वकील प्रॅक्टिस करतात. त्यांचेही पोट दररोज मिळणाऱ्या कामावर चालते. अशा वकिलांवर सध्या काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.

Adv Deepak Paikrao
अ‌ॅड. दीपक पाईकराव

By

Published : Apr 14, 2020, 12:29 PM IST

मुंबई - लॉकडाऊनची झळ सर्वच क्षेत्रांना बसली आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यात नवखे वकील सुद्धा आहेत, अशा वकिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून अ‌ॅड. दीपक पाईकराव यांनी पुढाकार घेतला आहे. पाईकराव यांनी अशा वकीलांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

हेही वाचा...'ती' बातमी साफ खोटी, कोरोनामुळे राज्याचे जिल्हानिहाय 'झोन' केलेले नाहीत - विश्वजीत कदम

लॉकडाऊनचा फटका अनेक वकिलांनाही बसला आहे. विक्रोळी न्यायालयात अनेक नवखे वकील प्रॅक्टिस करतात. त्यांचेही पोट दररोज मिळणाऱ्या कामावर चालते. अशा वकिलांवर सध्या काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. काही वकील भाड्याच्या घरात राहतात. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके करायचे काय, असा प्रश्न वकिलांचा समोर उभा राहिला होता. याचा विचार करून ज्येष्ठ वकील दीपक पाईकराव यांनी या वकिलांना मदतीचा हात म्हणून एक लाख रुपयांची मदत विक्रोळी बार असोसिएशनकडे केली आहे. काउंसिल मार्फत गरजू वकील शोधून त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येणार आहे.

टाळेबंदी असल्यामुळे वकिलांना काम नाही आहे. वकील असल्यामुळे कोणाकडे मागायलाही जाऊ शकत नाही. नवीन वकिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हे माझ्या लक्षात आले म्हणून मी अशा वकिलांना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार मी एक लाख रुपयाची निधी विक्रोळी बार असोसिएशनला दिला आहे. फक्त विक्रोळी न्यायालयातच नवखे वकील नसून मुंबईत अनेक ठिकाणी काम करतात, अशांना देखील सध्या मदतीची गरज आहे. ते कोणाकडे बोलू शकत नाही, त्यामुळे मुंबईचे जे बार असोसिएशन आहेत त्यांनी पुढे येऊन अशा वकिलांना मदत केली पाहिजे. असे आवाहन पाईकराव यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details