महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

India Covid update today चिंता वाढली, गेल्या 24 तासांत 10 हजार 649 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 36 मृत्यू - कोरोनाबाधित रुग्ण

India Covid update कोरोना महामारीत आज देशात काही चिंतेची बातमी आहे. आज देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. coronavirus cases today आज पुन्हा एकदा देशात कोरोनाचे १० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.

India Covid update
India Covid update

By

Published : Aug 24, 2022, 10:49 AM IST

मुंबईगेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,649 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी मंगळवारी देशात कोरोना संसर्गाचे ८,५८६ नवे रुग्ण नोंदवले गेले, तर ४८ जणांचा मृत्यू झाला. कालच्या तुलनेत दररोज नवीन बाधित coronavirus cases today रुग्णांच्या संख्येत 2063 ची वाढ झाली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्याआरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 10,649 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. India Covid update या दरम्यान 10,677 लोक कोरोना विषाणूवर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. यासह, देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 442 वर आली आहे. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 64 ने घट झाली आहे.

यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 43 लाख 68 हजार 195 झाली आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या ४ कोटी ३७ लाख ४३ हजार २०७ झाली आहे. Updates of Coronavirus त्याच वेळी, देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 27 हजार 452 लोकांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत लसीकरणाचा आकडाकोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार लसीकरणावर भर देत आहे. आतापर्यंत लसीकरणाचा आकडा 210 कोटी 58 लाख, 83 हजार 682 वर पोहोचला आहे. Updates of Coronavirus त्याचबरोबर गेल्या २४ तासांत २७ लाख १७ हजार ९७९ लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.

मुंबई कोरोना अपडेटमुंबईत आज २३ ऑगस्टला ८,७७२ चाचण्या करण्यात आल्या. मंगळवारी मुंबईत ८३२ नवे कोरोना रुग्णांची नोंद new corona cases in mumbai on 23 august 2022 झाली. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. ३३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३९ हजार ७७३ रुग्णांची नोंद झाली Mumbai Corona Update आहे. त्यापैकी ११ लाख १३ हजार ८२९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६२६९ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९६० दिवस इतका आहे. Updates of Coronavirus मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०७० टक्के इतका आहे.

रुग्णसंख्येत वाढमुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. Updates of Coronavirus त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२, ११ ऑगस्टला ६८३, १२ ऑगस्टला ८७१, १३ ऑगस्टला ८६७, १४ ऑगस्टला ८८२, १५ ऑगस्टला ५८४, १६ ऑगस्टला ३३२, १७ ऑगस्टला ९७५, १८ ऑगस्टला १२०१, १९ ऑगस्टला १०११, २० ऑगस्टला ८४०, २१ ऑगस्टला ८१८, २२ ऑगस्टला ५९२, २३ ऑगस्टला ८३२ रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचाBilkis Bano Case बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचे स्वागत करणे अयोग्य, देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details