मुंबई - शनिवारी राज्यात कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले आहेत. यात मुंबईतील 5 तर नागपूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 159 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
चिंताजनक.! राज्यात कोरोनाचे 6 नवे रुग्ण; मुंबईत 5 तर नागपुरात 1 - महाराष्ट्र आरोग्य मंत्रालय
शनिवारी राज्यात कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 159 वर पोहचली आहे.
![चिंताजनक.! राज्यात कोरोनाचे 6 नवे रुग्ण; मुंबईत 5 तर नागपुरात 1 कोरोना महाराष्ट्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6569624-thumbnail-3x2-aa.jpg)
Corona Maharashtra
हेही वाचा...'लॉकडाऊनसाठी केंद्राने दिरंगाई केली; पण आम्ही जनतेच्या पाठीशी उभे राहू'
महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बातमी सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांनी सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिक घरात बसले नाहीत, अथवा लॉकडाऊनचे नियम पाळले नाही तर कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे.