मुंबई - मुंबईत पुन्हा रुग्ण संख्या ( Covid Cases In Mumbai) वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 100 ते 200 च्या सुमारास असलेली रुग्णसंख्या 19 डिसेंबरला 300 च्या पुढे गेली आहे. तर 22 डिसेंबरला 490 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णही समोर येत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका आणि आरोग्य विभाग अलर्ट झाला असून रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी सज्ज झाला आहे.
रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबईत पहिली लाट गेल्या वर्षी मार्च महिन्यात तर दुसरी लाट यावर्षी फेब्रुवारीनंतर आली. दुसऱ्या लाटे दरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला 11 हजार रुग्ण आढळून आले आहेत. मात्र जूननंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. 1 डिसेंबरला सर्वात कमी म्हणजे 108 रुग्ण आढळून आले आहेत. मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 200 च्या वर गेली आहे. 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबर 295, 19 डिसेंबरला 336, 22 डिसेंबरला 490 रुग्ण आढळून आले आहेत.
7 लाख 68 हजार नागरिकांना कोरोना -
शहरात आतापर्यंत एकूण 7 लाख 68 हजार 148 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 46 हजार 784 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 366 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2419 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1962 दिवस इतका आहे. मुंबईमधील 14 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे. रुग्ण शोधण्यासाठी रोज सुमारे 40 ते 45 हजार चाचण्या करण्यात येत असून आतापर्यंत एकूण 1 कोटी 32 लाख 91 हजार 717 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
22 डिसेंबरला 490 रुग्ण -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबर 295, 18 डिसेंबर 283 रुग्ण आढळून आले. मात्र, त्यात वाढ होऊन 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490 रुग्ण आढळून आले आहेत.
सहा वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद होत होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा तर 22 डिसेंबरला सहाव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.