मुंबई -कोरोना विषाणूचा राज्यात प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयामंध्ये आता २५ टक्केच उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात सरकारच्या निर्णयानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लवकरच घर गाठल्याने सर्वत्र शुकशुकाट झाल्याचे पहावयास मिळाले. निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. याआधी ५० टक्के जणांनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यात आज दुपारपर्यंत आणखी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर जाऊन पोहोचली आहे. यानंतर राज्य सरकारने सर्व सरकारी कार्यालयामंध्ये आता २५ टक्केच उपस्थिती ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. याआधी सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची केवळ ५० टक्केच उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला होता. उद्यापासून पुढे दोन दिवस सरकारी सुट्टया आल्याने या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.