मुंबई भारतात कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात 7 हजार 591 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत घट पाहायला मिळाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी 24 तासांत 10 हजारांहून कमी कोरोनाबाधित रुग्ण Corona patient आढळले आहेत. देशात शुक्रवारी 9 हजार 520 नवीन कोरोना रुग्णांची New Coronavirus Cases नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत रविवारी 84 रुग्णांची घट झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची new cases recorded संख्या जास्त आहे.
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्तदेशात गेल्या 24 तासांत 9 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या देशात 84 हजार 931 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत. देशात रविवारी दिवसभरात 26 लाख 53 हजार 964 कोविड लसी देण्यात आल्या असल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. तर दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 4.58 टक्के आहे.