मुंबई - आपल्या जीवाची पर्वा न करता जे जीवनाच्या रणांगणावर कोविड (Covid Pandemic) महामारीशी लढले आणि अनेकांचे आयुष्य रक्षिले, त्या शूर डॉक्टर -नर्सेसना (Doctors and Nurses) मुंबईतील फेरी बोटवाल्यांनी (Ferry) खरोखर कोविड योद्धा (Corona Warriors) म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. फेरी बोटवाल्यांनी रेवस (Revas Ferry) आणि मोरामध्ये (Mora Ferry) राहणाऱ्या डॉक्टर -नर्सेसला त्यांच्या वैद्यकीय सेवेतील निवृत्तीपर्यत निःशुल्क अरबी समुद्रातून प्रवासाची मुभा दिली आहे. इतकेच नव्हे तर, दिव्यांग प्रवासी आणि मासळी विकणाऱ्या दिव्यांग कोळी महिलांना आयुष्यभरासाठी मुंबई -रेवस व मोरा -मुंबई मार्गावरील जलवाहतूक प्रवास निःशुल्क करण्यात आलेला आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट...
- डॉक्टर -नर्सेसना मोठा दिलासा-
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने अचानक लॉकडाउन लावला होता. परिणामी संपूर्ण देशाची रेल्वे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक ठप्प करण्यात आली होती. पहिल्या लाटेत तर मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, या कोरोनासारख्या अदृश्य संकटाशी जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यासारख्या हजारो कोरोना योद्धे जीवाची पर्वा न करता अविश्रांत काम करत होते. घरापासून हॉस्पिटल/कार्यालयापर्यंत सुखरूप ने-आण करण्याचे काम बेस्ट बसेस, एसटी बसेस करत होत्याच. तेव्हा मुंबईतील जे.जे रुग्णालय, कामा रुग्णालय, के.एम रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, नायर रुग्णालयात काम करणाऱ्या काही डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी रेवस आणि मोराला येथे राहात होत्या. मोरावरून येण्यासाठी काही साधन नसल्याने त्यांची मोठी पंचायत व्हायची. रेल्वे आणि बसेसने तासोंतास जायचे, मात्र, त्यांच्या मदतीला कोरोना काळात भाऊचा धक्कावरील फेरी बोट मालक धावून आले आहेत. या फेरी बोट मालकांनी मुंबई -मोरा व मुंबई - रेवस मार्गावरील या कोविड योद्धांसाठी निःशुल्क जल वाहतूक सुरु ठेवली होती. त्यामुळे रेवस आणि मोरामध्ये राहणाऱ्या डॉक्टर -नर्सेस यांना मोठा दिलासा मिळाला होता.
- या कारणामुळे निवृत्तीपर्यत निःशुल्क प्रवास -
मुंबई जलवाहतूक आणि औद्योगिक सहकारी संस्थेचे सचिव शराफत मुकादम यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, लॉकडाऊन काळात प्रवासी नसल्याने मुंबई -मोरा व मुंबई - रेवस मार्गावरील फेरी बोटी आम्ही बंद केल्या होत्या. मात्र, रेवस आणि मोरामध्ये राहणाऱया काही डॉक्टर -नर्सेस ज्या जे.जे रुग्णालय, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, कामा रुग्णालय, के.एम रुग्णालय, नायर रुग्णालय येथे काम करत होत्या, त्यांच्या सुविधेसाठी आम्ही फेरी बोटी सुरु केल्या होत्या. या कोविड योद्धांना आम्ही निःशुल्क प्रवास देत होतो. डॉक्टर -नर्सेसच्या कार्यालय वेळेवर आम्ही त्यांच्यासाठी विशेष फेरी बोट चालवत होतो. या बोटी चालवण्यासाठी आम्हाला साडे तीन ते चार हजार रुपयांचे इंधन लागत होते. मात्र, कोरोना सारख्या भयंकर महामारीत या खऱ्या कोविड योद्धानी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा, धैर्याचा, शौर्याचा, शर्थिंचा गौरव म्हणून मोरा आणि रेवसमध्ये राहणाऱ्या डॉक्टर -नर्सेसना आम्ही मुंबई ते मोरा दरम्यानचा फेरी बोटीचा प्रवास रुग्णालयातून निवृत्ती होईपर्यत निःशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -ठरलं..! 15 मार्चपासून सुरू होणार रो-रो सेवा, जाणून घ्या प्रवासी क्षमता
- या प्रवाशांना आयुष्यभर निःशुल्क प्रवास -