महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील बाल सुधारगृहात कोरोनाला नो एन्ट्री! योग्य उपाययोजनांमुळे संक्रमणाला अटकाव - Dongari remand home

मुंबईतील डोंगरी बाल सुधारगृह व माटुंगा परिसरातील डेव्हिड ससून इंडस्ट्रियल होम या ठिकाणी असलेल्या बालसुधारगृहात योग्य नियोजनामुळे या ठिकाणी अद्यापही कोरोना शिरकाव करू शकला नाही

डोंगरी बालसुधारगृह कोरोनामुक्त
डोंगरी बालसुधारगृह कोरोनामुक्त

By

Published : May 5, 2021, 1:59 PM IST

Updated : May 6, 2021, 10:46 AM IST

मुंबई - कोरोना संक्रमणामुळे एकीकडे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. राज्यातील 47 कारागृहांमध्ये कोरोना संक्रमित कैदी आढळून आलेले आहेत. मात्र दुसरीकडे मुंबईतील डोंगरी बाल सुधारगृह व माटुंगा परिसरातील डेव्हिड ससून इंडस्ट्रियल होम या ठिकाणी असलेल्या बालसुधारगृहात योग्य नियोजनामुळे या ठिकाणी अद्यापही कोरोना शिरकाव करू शकला नाही, याबाबत ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट..

कोरोना चाचणी अनिवार्य-

देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यापासून बाल सुधारगृहात योग्य ती काळजी व उपाययोजना केल्या जात आहेत. डोंगरीतील बाल सुधारगृह असेल किंवा माटुंगा परिसरातील डेव्हिड ससून इंडस्ट्रियल होम या ठिकाणी असलेल्या बालसुधारगृह या दोन्ही ठिकाणी कोरोना काळात एखादा विधी संघर्ष मुलगा किंवा अल्पवयीन मुलगी येत असेल तर सुरुवातीला त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीमध्ये जर एखादा मुलगा किंवा मुलगी ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये संपूर्ण उपचार केल्यानंतरच त्यांना बाल सुधारगृहमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.

भेटण्यासाठी येणार्‍यांना सध्या मनाई

घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना हेरून माटुंग्यातील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल होम या ठिकाणी आणले जात आहे. या बरोबरच या मुलांना भेटण्यासाठी बाहेरून येणार्‍यांना सध्या मनाई करण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचं इथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे.

डोंगरी बाल सुधारगृहात अशी घेतली जात आहे खबरदारी

मुंबईतील डोंगरी परिसरातील डोंगरी बाल गृहात सध्याच्या घडीला 100 अल्पवयीन मुले आहेत. यामध्ये 60 मुलांचा समावेश असून 40 मुलींचा समावेश आहे. या सर्वांना तोंडाला मास्क लावणे हे बंधनकारक करण्यात आलेल असून बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांकडून सुद्धा या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. याबरोबरच बालसुधारगृहातील सर्व खोल्या या नियमितपणे त्यांनी सॅनिटाइस केल्या जात आहेत.

माटुंग्यातील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल होम या ठिकाणी तब्बल 119 मुले ठेवण्यात आलेली असून यांनासुद्धा दररोज प्रोटीन युक्त आहार दिला जात आहे. या 119 मुलांची काळजी घेण्यासाठी 54 कर्मचाऱ्यांचा स्टाफ सध्या कार्यरत असून या सर्व मुलांना वैद्यकीय निगराणी खाली ठेवण्यात आलेल आहे. याबरोबरच याठिकाणी 2 परिचारिका या 2 शिफ्टमध्ये 24 तास ठेवण्यात आलेले आहेत. त्या मुलांना भेटायला येणार्‍या बाहेरील व्यक्तींना सध्या मनाई करण्यात आलेली आहे.

विधी संघर्ष मुलांच्या आहारावर अधिक लक्ष

डोंगरी बालसुधारगृहातचे अधीक्षक राहुल कंठीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या बालसुधारगृहातील मुले सकाळी 6 वाजता उठल्यानंतर त्यांना सर्वप्रथम उत्तम नाश्ता दिला जातो. यामध्ये हळदीचे दूध , अंड , पोहे किंवा उपमा या पदार्थांचा समावेश असतो, सकाळची न्याहरी झाल्यानंतर तब्बल 1 तास बालसुधारगृहातील मुलांकडून व्यायाम व योगा करून घेतला जातो. दुपारच्या दरम्यान प्रथिनयुक्त डाळ, हिरव्या पालेभाज्या सलाड , सारखे पदार्थ या मुलांना जेवणात दिले जातात. याबरोबरच संध्याकाळचा नाष्ट्यात प्रथिनयुक्त पदार्थ खाण्यास दिले जात आहेत. रात्रीच्या जेवणातसुद्धा त्यांना देण्यात येणाऱ्या आहारात प्रथिनांचा अधिक समावेश असल्याच त्यांनी सांगितले आहे.

दिवसातून 2 वेळा सलाड ,आठवड्यातून 2 वेळा मांसाहार , सकाळी पिण्यास गरम पाणी याबरोबरच बालसुधारगृहातील खोल्या या सॅनिटाईज करण्यासाठी योग्य तो बंदोबस्त करण्यात आलेला असून कोरोना संक्रमण काळामध्ये मुलांनी कुठल्या प्रकारची स्वतःची काळजी घ्यावी याचं प्रशिक्षण सुद्धा त्यांना देण्यात आलेल आहे.

कोरोनामुळे बाल गुन्हेगारीत घट

कोरोना संक्रमण पसरण्याचा अगोदर या बालसुधार गृहात या आगोदर 150नते 200 मुलं ही आढळून यायची. मात्र कोरोना संक्रमण सुरू झाल्यामुळे बाल गुन्हेगारी घट झाल्याने 250 मुलांची क्षमता असलेल्या डोंगरी बालगृहात सध्याच्या घडीला 100 विधी संघर्ष मुलांना ठेवण्यात आलेले आहेत.

Last Updated : May 6, 2021, 10:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details