महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आता हाॅटेलमध्ये - मुंबई पालिका कर्मचारी

मुंबई पालिकेचे बहुतेक कर्मचारी मुंबईबाहेर राहत आहेत. त्यांना ठाणे, कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वसई, विरार, नवी मुंबई, पनवेल आदी विभागातून मुंबईत कामासाठी यावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी बेस्ट आणि एसटी बसची सुविधा केली आहे.

Mumbai Municipal
मुंबई महानगरपालिका

By

Published : May 2, 2020, 12:47 PM IST

मुंबई - देशभरात लॉकडाऊन सुरू असताना मुंबईत रोज कोरोनाचे शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याना 'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स'ने राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर पालिकेच्या मुंबई बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची, खाण्याची, लॉन्ड्रीची व्यवस्था करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहतील, अशी पालिकेला अपेक्षा आहे.

मुंबईत कोरोना विषाणूचे दररोज शेकडो नवीन रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईमधील रुग्णांचा आकडा 7625 वर गेला आहे. दररोज नव्याने रुग्ण वाढत असताना पालिकेचा आरोग्य विभाग रुग्णांवर उपचार करत आहे. तर या विषाणूचा सामना घरात बसून करणाऱ्या नागरिकांना पालिकेकडून पाणी, अन्नधान्य पोहचवणे आदी सेवा पुरवली जात आहे. त्यातच पालिका कर्मचाऱ्यांना, आरोग्य कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण होऊ लागल्याने कर्मचारी कमी पडू लागले आहे. त्यासामुळे पालिकेने 100 टक्के कामगारांच्या उपस्थितीसाठी हा नियम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागू केला आहे.

हेही वाचा...मुंबईत कोरोनाचे नवे 751 रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 हजार 625 वर

पालिकेचे बहुतेक कर्मचारी मुंबईबाहेर राहत आहेत. त्यांना ठाणे, कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वसई, विरार, नवी मुंबई, पनवेल आदी विभागातून मुंबईत कामासाठी यावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी बेस्ट आणि एसटी बसची सुविधा केली आहे. मात्र, ते राहत असलेल्या पालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्याना मुंबईतच राहण्याची सोय करावी, अशी मागणी इतर महापालिकेकडून करण्यात आली. ताज हॉटेलने आरोग्य कर्मचाऱ्याना राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे. त्याचप्रमाणे मुंबईमधील इतर हॉटेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय करण्याचे आदेश सर्व विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

काय असणार हॉटेलचा दर ?

'ताज हॉटेल'द्वारे स्विकारण्यात आलेल्या दरांच्या धर्तीवर हॉटेलच्या दर्जानुसार दर निर्धारित करून मुंबई महापालिका क्षेत्रातील इतर हॉटेल्समध्ये देखील रूम 'बुक' करण्याची कार्यवाही करण्यासाठी परिपत्रक काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार सहआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) रमेश पवार यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार हॉटेलमधील प्रत्येक खोलीत दोन व्यक्ती राहतील. या परिपत्रकान्वये पंचतारांकित हॉटेल साठी प्रति दिवशी रुपये 2 हजार, 4 तारांकित हॉटेल साठी प्रतिदिन रुपये 1 हजार 500, तीन तारांकित हॉटेल असल्यास दर दिवशी रुपये 1 हजार ; तर विना तारांकित हॉटेल असल्यास प्रतिदिवशी रुपये 500/- असा दर निर्धारित करण्यात आला आहे. या रकमेत दोन व्यक्तींच्या निवासासह नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण आणि लॉन्ड्री सर्विसचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details