महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत शुक्रवारी 29 हजार 478 जणांचे कोरोना लसीकरण - Good response to vaccination in Mumbai

1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 29 हजार 478 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 3 लाख 12 हजार 775 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

शुक्रवारी 29 हजार 478 जणांचे कोरोना लसीकरण
शुक्रवारी 29 हजार 478 जणांचे कोरोना लसीकरण

By

Published : Mar 5, 2021, 11:19 PM IST

मुंबई - मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 29 हजार 478 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 3 लाख 12 हजार 775 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत आज शुक्रवारी 53 लसीकरण केंद्रांतील 174 बूथवर 18 हजार 400 लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच एकूण 29 हजार 478 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 26 हजार 47 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 440 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 3 लाख 12 हजार 775 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 2 लाख 75 हजार 667 लाभार्थ्यांना पहिला तर 37 हजार 108 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 1 लाख 49 हजार 92 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 5 हजार 579 फ्रंटलाईन वर्कर, 52 हजार 777 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 5 हजार 327 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

महापालिकेतील लसीकरण

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 18 हजार 545 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 54 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 21 हजार 599 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रात 2 लाख 53 हजार 53 लाभार्थ्यांना पहिला तर 34 हजार 394 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 लाख 87 हजार 447 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

सरकारी रुग्णालयातील लसीकरण

केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 426 लाभार्थ्यांना पहिला तर 32 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 458 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 7 हजार 91 लाभार्थ्यांना पहिला तर 662 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 7 हजार 753 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयातील लसीकरण

खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील आज 7 हजार 76 लाभार्थ्यांना पहिला तर 354 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 7 हजार 430 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 15 हजार 523 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 52 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 17 हजार 575 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

आतापर्यंतचे लसीकरण

आरोग्य कर्मचारी - 1,49,092
फ्रंटलाईन वर्कर - 1,05,579
जेष्ठ नागरिक - 52,777
45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार - 5,327
एकूण - 3,12,775

ABOUT THE AUTHOR

...view details