मुंबई -मुंबईमध्ये ( Mumbai ) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ ( Corona Cases Increases ) होऊ लागली आहे. रविवारी कोरोनाच्या आजाराने पाच जणांची प्राणज्योत मालवली. मुंबईत सध्या ६७१ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ६४ रुग्ण ऑक्सिजनवर, १५३ रुग्ण आयसीयूमध्ये तर २५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
१२.६५ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह -मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १३ हजार ४३५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १७०० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १२.६५ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ५ मृत्यूची नोंद झाली आहे. २०८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ७ हजार ३७१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७५ हजार ०४५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२ हजार ७२७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४४४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१५० टक्के इतका आहे.
२५ रुग्ण व्हेंटिलेटरवर -मुंबईत आज आढळून आलेल्या १७०० रुग्णांपैकी १६१५ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ७६९ बेड्स असून त्यापैकी ६७१ बेडवर रुग्ण आहेत. ६४ रुग्ण ऑक्सिजनवर, १५३ रुग्ण आयसीयूमध्ये तर २५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.