मुंबई -मुंबईमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आटोक्यात येत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी घसरत चालला आहे. गेल्या काही दिवसात मुंबईमधील रुग्णसंख्या दुप्पट झाली असून रुग्ण दुपटीचा कालावधी ११ दिवसात ४४६ दिवसांनी घसरला आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास मुंबईमध्ये लॉकडाऊन लावला जाईल असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
Corona update : मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट तर ११ दिवसात रुग्ण दुपटीचा कालावधी ४४६ दिवसांनी घसरला - मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाला. त्यावेळी मुंबईत दिवसाला ३०० रुग्ण आढळून येत होते. रुग्णसंख्या कमी होत असल्याने त्यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी ५३४ दिवसांवर पोहचला होता.
रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाला. त्यावेळी मुंबईत दिवसाला ३०० रुग्ण आढळून येत होते. रुग्णसंख्या कमी होत असल्याने त्यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी ५३४ दिवसांवर पोहचला होता. फेब्रुवारीच्या मध्यापासून मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला ११ हजार रुग्ण आढळून येऊ लागले. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी ४० दिवसांवर आला होता. ऑगस्ट दरम्यान पुन्हा रुग्णसंख्या कमी झाली. दिवसाला सुमारे २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे १८ ऑगस्टला रुग्ण दुपटीचा कालावधी २०५७ दिवसांवर पोहचला होता. मात्र, गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढू लागल्याने २९ ऑगस्ट रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी १६११ दिवसांवर घसरला आहे. गेल्या ११ दिवसात ४४६ दिवसांनी रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला आहे.
दुपटीचा कालावधी घसरला म्हणजे प्रसार अधिक
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार गेले दीड वर्ष आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतो. रुग्णसंख्या वाढल्यावर दुपटीचा कालावधी कमी होतो. दुसऱ्या लाटेदरम्यान फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढू लागल्यावर एप्रिल महिन्यात दिवसाला ११ हजार रुग्ण आढळून आले. त्यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन ४० दिवसांवर आला होता. ऑगस्टमध्ये दिवसाला २०० ते ३०० रुग्ण आढळून येत असल्याने हा कालावधी २०५८ दिवसांवर पोहचला होता. मात्र आता हा कालावधी कमी होत आहे. याचा अर्थ कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरु झाला आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
७ लाख ४३ हजार नागरिकांना कोरोना
मुंबईमध्ये गेल्या वर्षी ११ मार्चला पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. तेव्हापासून २९ ऑगस्टपर्यंत गेल्या दीड वर्षात ७ लाख ४३ हजार ४९८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७ लाख २२ हजार ०३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १५ हजार ९७४ रुग्णांचा कोरोनामुळे झाला आहे. सध्या मुंबईत ३ हजार ०३६ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १६११ दिवस इतका आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३० इमारती तर ११०७ मजले सील करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
तर पुन्हा लॉकडाऊन
मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. जे तज्ञ सांगत आहे, त्यानुसार एका दिवसाला आपल्याला मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडतील, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी केले आहे. तसेच रूग्ण संख्या वाढली, तर आपल्याला पुन्हा लॅाकडाऊन करावे लागेल. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचेही त्या म्हणाल्या.
असा घसरला दुपटीचा कालावधी
दिनांक रुग्णदुपटीचा कालावधी
१८ ऑगस्ट २०५७ दिवस
२२ ऑगस्ट २०३० दिवस
२३ ऑगस्ट १९८३ दिवस
२४ ऑगस्ट १९५८ दिवस
२५ ऑगस्ट १८८४ दिवस
२६ ऑगस्ट १८२५ दिवस
२७ ऑगस्ट १७४७ दिवस
२९ ऑगस्ट १६११ दिवस
अशी वाढतेय रुग्णसंख्या
दिनांक रुग्णसंख्या
१७ ऑगस्ट १९८
१८ ऑगस्ट २८३
२० ऑगस्ट ३२२
२१ ऑगस्ट २५९
२२ ऑगस्ट २९४
२५ ऑगस्ट ३४३
२६ ऑगस्ट ३९७
२८ ऑगस्ट ३८८
२९ ऑगस्ट ३४५