मुंबई -राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 हजाराहुन कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज शुक्रवारी 695 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 631 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
6,534 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 695 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 42 हजार 372 वर पोहचला आहे. तर आज 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 223 वर पोहचला आहे. आज 631 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 90 हजार 936 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 66 लाख 39 हजार 988 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 9.97 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 75 हजार 290 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 6 हजार 534 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 194
ठाणे पालिका - 20
नवी मुंबई पालिका - 26
नाशिक पालिका - 31
अहमदनगर - 30
पुणे - 45
पुणे पालिका - 82
पिंपरी चिंचवड पालिका - 49
हेही वाचा -Omicron Patient in Mumbai - मुंबईत आणखी ३ रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग, एकूण रुग्णसंख्या ५ वर
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
25 ऑक्टोबरला घट होऊन 889,
1 नोव्हेंबरला 809,
5 नोव्हेंबरला 802,
6 नोव्हेंबरला 661,
7 नोव्हेंबरला 892,
8 नोव्हेंबरला 751,
9 नोव्हेंबरला 982,
11 नोव्हेंबरला 997,
22 नोव्हेंबरला 656,
23 नोव्हेंबरला 766,