महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

By

Published : Jun 14, 2021, 6:44 AM IST

Updated : Jun 14, 2021, 10:17 PM IST

कोरोना अपडेट
Corona Update

22:17 June 14

मुंबई कोरोना अपडेट : चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद, सोमवारी 529 नवे रुग्ण

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 529 नवे रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारीनंतर गेल्या चार महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 725 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 672 दिवसांवर पोहचला आहे. 

20:56 June 14

कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीवर लक्ष, पोलिओ लसीकरणाच्या आधारे घेणार माहिती

मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा आल्या आणि त्यावर पालिकेने नियंत्रण मिळवले आहे. असे असताना तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज झाली असून झोपडपट्टीवर लक्ष केंद्रित केले आहे. धारावी परीसरातील पोलिओ लसीकरणाची माहिती पालिकेकडून संकलन केली जाते आहे. या माहितीच्या आधारे प्रत्येक घरातील बालकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच बालरोग तज्ञांची मदतही घेतली जाणार आहे.

20:18 June 14

आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने चार व्हेंटिलेटर गडचिरोली जिल्ह्यासाठी सुपुर्द

गडचिरोली -  उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रूग्णालयातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण करणेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी चार व्हेंटिलेटर गडचिरोली जिल्ह्यासाठी देण्यात आले. यातून ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण होईल, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हेंटीलेटर लोकार्पण करते वेळी व्यक्त केले. ते सोमवारी गडचिरोली येथे आले होते. यावेळी मंत्री शसामंत यांनी दिलेले व्हेंटिलेटर लवकरात लवकर सुरू करून आरोग्यसेवेत दाखल करावेत अशा प्रशासनाला सूचना दिल्या.  

17:30 June 14

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा पहिल्या टप्प्यात येईपर्यंत मुंबईकरांसाठी लोकल सेवा नाही - वडेट्टीवार

मुंबई - सध्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या आठवड्यात जवळपास 15 जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत.  या 15 जिल्ह्यांमधून सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र मुंबईत सावध पवित्रा म्हणून अजूनही तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध मुंबईसाठी लावण्यात आले आहेत. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी होत असला तरी जोपर्यंत मुंबई पहिल्या टप्प्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईची लोकल सेवा सुरू केली जाणार नसल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. मुंबईकरांची काळजी असल्याकारणाने अद्याप लोकल सेवा सुरु करता येणार नाही असेही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले. 

16:45 June 14

धारावीत आज कोरोना रुग्ण संख्या शुन्यावर.. वर्षभरात सातव्यांदा शून्य रुग्णसंख्या

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले त्यावेळी धारावीतही रुग्ण वाढू लागले होते. धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या काही दिवसात येथील रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज तर धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा तर गेल्या वर्षभरात धारावीत सातव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. 

16:44 June 14

पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल

पुणे/ पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून यात लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयात 50 बेडचे लहान मुलांचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यात, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी इनडोअर गेम देखील आहेत. रुग्णालयात बालरोग तज्ञ डॉक्टरांची टीम देखील असणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब होडगर यांनी दिली आहे.  

12:23 June 14

कोल्हापुरात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक सुरू

तिसऱ्या लाटेची तयारी करत असताना कोल्हापूरात बालरोग विभाग आणि टास्कफोर्स तयार करण्यात आले असल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.  

तिसऱ्या लाटेत टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील महाराणी ताराबाई सभागृहात आढावा बैठक सुरू आहे.

09:25 June 14

देशात गेल्या ७२ दिवसांतील सर्वाधीक कमी रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहीतीनुसार देशात 70,421 नवे कोरोनाबाधित आढळले आहे, तर गेल्या २४ तासांत 3921 जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर 1,19,501 रुग्ण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. देशात गेल्या ७२ दिवसांतील सर्वाधीक कमी रुग्णांची नोंद आज करण्यात आली.

एकूण रुग्णसंख्या - 2,95,10,410 

एकूण बरे झालेले रुग्ण - 2,81,62,947 

एकूण मृत्यू - 3,74,305 

एकूण सक्रिय रुग्णसंख्या - 9,73,158 

एकूण लसीकरण -25,48,49,301

06:38 June 14

साताऱ्यात काल आढळले सर्वाधिक 174 कोरोनाबाधित रुग्ण

सातारा- जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 856 नविन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 16 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली. काल तालुक्यात सर्वाधिक 174 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यामध्ये 10 हजार 708 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर 738 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 

06:25 June 14

महाराष्ट्रात आढळले 10,442 नवे कोरोनाबाधित, 483 जणांच्या मृत्यूची नोंद, तर 7,504 रुग्ण झाले बरे

एकूण रुग्णसंख्या -  59,08,992  

एकूण बरे झालेले रुग्ण -  56,39,271  

एकूण मृत्यू -1,11,104

एकूण सक्रिय रुग्णसंख्या - 1,55,588

06:05 June 14

मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ सुरूच

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 700 नवे रुग्ण आढळून असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 704 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत आहे. हा कालावधी 653 दिवसांवर पोहचला आहे.
 

Last Updated : Jun 14, 2021, 10:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details