मुंबई -कोरोना पार्श्वभूमीवर विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारा संदर्भातील चाचण्या घेता येतील आणि त्याचे अहवाल देता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या.
कोरोना : राज्यातील सर्व विद्यापीठात मल्टीपर्पज लॅब सुरू करा - उदय सामंत - minister uday samant
राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू सोबत सामंत यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक घेऊन या संदर्भातील सूचना दिल्या.
राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू सोबत सामंत यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक घेऊन या संदर्भातील सूचना दिल्या. गेल्या काही दिवसात नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने अशा प्रकारची लॅब सुरू केली असून त्याठिकाणी आजारांच्या संदर्भात आणि इतर विविध प्रकारच्या चाचण्या या लॅबमध्ये केल्या जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठानी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू कराव्यात. यासाठी आवश्यकता पडल्यास राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून परवानगी मिळवून देण्यात येईल अशी ग्वाहीही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंच्या या बैठकीत दिली.
राज्यात आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाणार आहे काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने यासाठीचा एक प्रयोग सुरू केला आहे. एनएसएसच्या या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांकडून परवानगी घेऊन हे विद्यार्थी आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी आणले गेले असून त्या धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा हे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी देता येतील काय यासाठी ची माहिती घेऊन त्याचा अहवाल द्यावा अशी सूचनाही सामंत यांनी कुलगुरूंनी केली.