मुंबई - कोरोना व्हायरसचे थैमान राज्यात सुरुच आहे. एकीकडे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज कोरोनामुळे मुंबईत एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला हा तिसरा रुग्ण आहे. याआधी 17 आणि 21 मार्चला दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
#Corona : राज्यात कोरोनाचा तिसरा बळी, 64 वर्षीय वृद्धाचा मुंबईत मृत्यू - कोरोना मृत्यू
कोरोनामुळे मुंबईत एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
कोरोना
#Corona : राज्यात कोरोनाचा तिसरा बळी, 64 वर्षीय वृद्धाचा मुंबईत मृत्यू
ही व्यक्ती 15 मार्चला दुबईवरून पहिल्यांदा अहमदाबादमध्ये आली होती. त्यानंतर 20 मार्चला ती मुंबईत आली. या व्यक्तीस उच्चरक्तदाब, अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता. प्रकृती गंभीर असल्याने 23 मार्चला रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवार (23 मार्च) संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. कोरोनाच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
दरम्यान, 22 मार्चला एकाचा मृत्यू झाला होता. मात्र, तो कोरोनामुळे नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते.
Last Updated : Mar 24, 2020, 2:23 PM IST