मुंबई - राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा एका रात्रीत 11 ने वाढला आहे. यामध्ये दहा पॉझिटीव्ह मुंबईत आढळले असून अन्य एक पुण्यात सापडला आहे. आता राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये विदेशातून आलेल्या आठ जणांचा समावेश आहे. तसेच अन्य तिघांना संसर्गाने कोरोना झाल्याचे त्यांनी सांगितले.
#CORONA VIRUS : राज्यातील आकडा 63 वर! मुंबईत 10 तर, पुण्यात एका रुग्णाची वाढ
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा एका रात्रीत 11 ने वाढला आहे. आता राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील आकडा 63 वर! मुंबईत दहा तर, पुण्यात एका रुग्णाची वाढ
राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिक माहिती दिली असून गरज पडल्यास बसेस आणि लोकल बंद करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाश्यांना आणखी रेल्वे उपलब्ध करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.
सध्या राज्य सरकार रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी टेस्टींग फॅसिलीटीज वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नव्याने लॅब उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
Last Updated : Mar 21, 2020, 11:41 AM IST