मुंबई- मुंबईत गेले काही दिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 696 नवे रुग्ण आढळले असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 658 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी 598 दिवसांवर पोहोचला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी 598 दिवस
मुंबईत आज 696 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 15 हजार 146 वर पोहोचला आहे. आज 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 146 वर पोहोचला आहे. आज 658 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 81 हजार 946 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 15 हजार 819 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 598 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 24 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 92 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 26 हजार 228 तर आतापर्यंत एकूण 65 लाख 61 हजार 197 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.