मुंबई- मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. 18 मे रोजी 953 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ झाली होती. काल (शुक्रवारी) 929 रुग्ण आढळून आले होते. त्यात आज शनिवारी वाढ होऊन 1 हजार 48 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1359 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी 399 दिवस
मुंबईत आज 1 हजार 48 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 4 हजार 509 वर पोहचला आहे. तर 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 833 वर पोहचला आहे. 1 हजार 359 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 59 हजार 899 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 27 हजार 617 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 399 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 40 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 172 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 26 हजार 751 तर आतापर्यंत एकूण 62 लाख 29 हजार 330 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.