महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आशादायक; राज्यात कोरोनाचे नव्याने फक्त 34 रुग्ण, राज्यातील रुग्णांचा आकडा 3236 वर - कोरोना संसर्ग

राज्यातील कोरोना रुग्णाचा आकडा वाढताना दिसत होता. मात्र, गुरुवार सायंकाळपासून आज सकाळपर्यंत महाराष्ट्रात अवघे 34 रुग्ण आढळून आले आहेत.

Corona
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 17, 2020, 2:59 PM IST

मुंबई- राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत अवघे 34 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील नव्याने रोज आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा कमी रुग्ण आढळून आल्याने काही प्रमाणात दिलासा देणारी बाब आहे. राज्याप्रमाणेच मुंबईमधील आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाल्याने मुंबईसाठीही दिलासा देणारी बाब आहे.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसात रोज 250 ते 300 हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णाचा आकडा वाढताना दिसत होता. मात्र गुरुवार सायंकाळपासून आज सकाळपर्यंत महाराष्ट्रात अवघे 34 रुग्ण आढळून आले आहेत. यात मालेगाव महापालिकेच्या हद्दीत 4, मुंबई महापालिकेच्या हद्दीत 6, पुणे महापालिकेच्या हद्दीत 23, ठाणे महापालिकेच्या हद्दीत 1 असे एकूण 34 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3236 वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत 300 रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आले आहे. तर 194 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

मुंबईतील नागरिकांनाही दिलासा


मुंबईत कोरोनाचे रोज 150 ते 200 हुन अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र गुरुवार सायंकाळपर्यंत 107 रुग्ण आढळून आले होते. आज सकाळपर्यंत अवघे 6 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील रुग्णांची संख्या 2049 वर पोहचली आहे. मुंबईतही नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने मुंबईसाठीही दिलासादायक बाब आहे. मुंबईत कोरोनामुळे 116 जणांचा मृत्यू झाला असून 202 रुग्ण कोरोनातून पूर्ण बरे झाले असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details