महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Patients : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, मात्र ८१ टक्के बेड्स रिकामे - ८१ टक्के बेड्स रिकामे मुंबई

मुंबईत आज (गुरुवारी) 13 हजार 702 कोरोना रुग्ण आढळले ( 13 Thousand 702 Corona Patients Were Found Today), तर 06 जणांचा मृत्यू झाला. तरीही बहुसंख्य रुग्ण हे घरी राहूनच बरे होत असल्याने रुग्णालयात भरती करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने मुंबईमधील तब्बल ८१ टक्के बेड रिक्त ( 81% of Beds in Mumbai are Vacant ) आहेत.

मुंबई कोरोना बेड संख्या
मुंबई कोरोना बेड संख्या

By

Published : Jan 13, 2022, 7:42 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave of Corona Virus ) आली आहे. रोज १२ ते २० हजार रुग्ण आढळून येत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाखावर तर होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या ८ लाखांवर ( 8 Lakh Home Quarantine Patients ) गेली आहे. मुंबईत आज (गुरुवारी) 13 हजार 702 कोरोना रुग्ण आढळले ( 13 Thousand 702 Corona Patients Were Found Today), तर 06 जणांचा मृत्यू झाला. तरीही बहुसंख्य रुग्ण हे घरी राहूनच बरे होत असल्याने रुग्णालयात भरती करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने मुंबईमधील तब्बल ८१ टक्के बेड रिक्त ( 81% of Beds in Mumbai are Vacant ) आहेत.

  • ८ लाख रुग्ण होम क्वारंटाईन

मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात महापालिकेला यश आले आहे. डिसेंबरपासून विषाणूची तिसरी लाट आली आहे. या लाटेदरम्यान ३ दिवस रोज रुग्णसंख्या २० हजारच्यावर गेली होती. त्यानंतर त्यात घट झाली. रुग्णसंख्या १२ हजारापर्यंत खाली आली. मात्र पुन्हा त्यात वाढ होऊन रुग्णसंख्या १६ हजारावर गेली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २ हजार २८२ वर पोहचली आहे. तर ८ लाख १४ हजार ५९५ होम क्वारंटाईन रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

  • ८१ टक्के बेड रिक्त

मुंबईत रोज आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. ५ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असल्याने त्यांना रुग्णालयात किंवा कोविड सेंटरला भरती केले जाते. तर १ ते २ टक्के रुग्णांना ऑक्सिजन किंवा आयसीयू बेडची गरज भासत आहे. मुंबईत पालिका, खासगी रुग्णालयांमध्ये ३६,८११ बेडस असून त्यापैकी ६९४६ बेडवर म्हणजेच १८.८ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८१.२ टक्के बेड रिक्त आहेत.

  • ३६ हजारपैकी २९ हजार बेड्स रिक्त

१२ जानेवारीच्या आकडेवारीनुसार एकूण ३६ हजार ९७९ बेडपैकी २९ हजार १० बेड रिक्त आहेत. त्यामधील रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये २२ हजार ८०२ बेडपैकी १६ हजार ३९२ बेड रिक्त आहेत. ऑक्सिजनचे ११ हजार ८५४ बेड्स असून त्यापैकी ९ हजार ४८ बेड्स रिक्त आहेत. आयसीयूचे ३ हजार ५३ बेड्स असून त्यापैकी २ हजार १५६ बेड्स रिक्त आहेत. व्हेंटिलेटरचे १ हजार ५४७ बेड्स असून त्यापैकी १००९ बेड रिक्त आहेत.

  • यामुळे बेड रिक्त

मुंबईत रोज आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी ९३ टक्के रुग्ण इमारतीमधील आहेत. तसेच जे रुग्ण आढळून येत आहेत त्यापैकी ९० टक्के रुग्णांना लक्षणे नसल्याने ते घरच्या घरी बरे होऊ शकतात. यामुळे त्यांच्या घरी क्वारंटाईनच्या सोयीसुविधा असल्याने त्यांना होम क्वारंटाईन केले जाते. ५ ते ६ टक्के रुग्णांना रुग्णालयाची गरज भासत आहे. रोज हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याने रुग्णालयातील बेड्स रिक्त आहेत. बेडची आवश्यकता भासल्यास कोविड सेंटरमध्ये बेड्स वाढवले जातील. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटरमध्ये ४० हजार तर झोपड्पट्टीमधील रुग्णांसाठी ३० हजार असे एकूण १ लाख बेड्स सज्ज आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  • एकूण ९ लाख ५६ हजार २८७ रुग्णांची नोंद

मुंबईत आतापर्यंत एकूण ९ लाख ५६ हजार २८७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८ लाख ३४ हजार ९६२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २ हजार २८२ वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३६ दिवस इतका आहे. मुंबईमधील ५६ इमारती सील आहेत. ५ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.८५ टक्के इतका आहे.

  • अशी वाढली रुग्णसंख्या

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून ( corona cases in Mumbai ) आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारीला ६३४७, २ जानेवारीला ८०६३, ३ जानेवारीला ८०८२, ४ जानेवारीला १०८६०, ५ जानेवारीला १५,१६६, ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

  • नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -India Corona Updates : देशात मागील 24 तासात दोन लाखांपेक्षा जास्त रूग्णांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details