महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोव्हिड रुग्णाने डॉक्टरच्या मानेवर केले चाकूने वार, प्रकृती चिंताजनक - मलबार हिल कोविड सेंटर

रुग्णाच्या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सध्या केले जात आहेत. डॉक्टरची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.

धक्कादायक! मुंबईत कोरोना रुग्णाचा डॉक्टरवर चाकूने हल्ला!
धक्कादायक! मुंबईत कोरोना रुग्णाचा डॉक्टरवर चाकूने हल्ला!

By

Published : Apr 21, 2021, 9:33 AM IST

Updated : Apr 21, 2021, 12:14 PM IST

मुंबई : मलबार हिल कोविड सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाने डॉक्टरवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णाच्या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सध्या केले जात आहेत. डॉक्टरची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.

चाकूने गळ्यावर, पाठीवर वार

मलबार हिलमधील कोविड सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाने वादानंतर डॉक्टरवर हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयसीयूमध्ये हलविण्यावरून डॉक्टर व रुग्णात वाद झाला. त्यानंतर रुग्णाने डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला. या रुग्णाने डॉक्टरचा पाठलाग करत गळ्यावर आणि पाठीवर चाकूने वार केल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, जमखी डॉक्टरवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

Last Updated : Apr 21, 2021, 12:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details