मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721 तर आज 736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 736 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 16 हजार 478 वर पोहचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 430 वर पोहचला आहे. 473 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 97 हजार 995 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 6201 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 417 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 57 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 258 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 30 लाख 80 हजार 528 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -