मुंबई -राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असताना राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दोन बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचे आवाहन देखील दोन्ही नेत्यांनी केले आहे.
Eknath Shinde Corona Positive : शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा - यशोमती ठाकूर कोरोना
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दोन बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोन्ही नेत्यांनी पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली.
Shivsena corona positive
राज्यात कोरोना आणि ओमायक्रोनचा संसर्ग वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घेत, निर्बंध वाढवले आहेत. प्राथमिक शाळा देखील ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवल्या आहेत. महाविद्यालये, विद्यापीठांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंत्री पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. आज शिवसेना खासदार अरविंद सावंत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आले आहेत. दोन्ही नेत्यांनी पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, वर्षा गायकवाड, धीरज देशमुख, भाजपचे राधाकृष्णा विखे- पाटील, पंकजा मुंडे, सागर मेघे, इंद्रनिल नाईक, माधूरी मिसाळ, हर्षवर्धन पाटील, विद्या ठाकूर, अतुल भातखळकर, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, प्राजक्त तनपुरे, शेखर निकम, शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील, दिपक सावंत या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.