महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट : उपासमारीची वेळ आल्याने घरकाम करणाऱ्या महिला उतरल्या रस्त्यावर... - housework women agitation in mulund

कोरोनामुळे सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यात अनेक उद्योगधंदे बंद झाल्यामुळे कित्येकांचे रोजगार बुडाले. त्यातही हातावर पोट असणाऱ्यांच्या तर दोन वेळेच्या जेवणाचे हाल झाले आहेत.

corona lockdown effect housework women life becomes difficult due to financial crisis
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घर काम करणाऱ्या महिलांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ

By

Published : Jun 9, 2020, 10:38 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात घरकाम करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातच कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर बोलवण्यास घर मालकांनी बंद केले आहे. त्यामुळेच आता जगायचे कसे? असा प्रश्न या महिला कामगारांना सतावत आहे. त्यामुळे आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मुलुंडमधील घरकाम करणाऱ्या महिलांनी आज (मंगळवार) मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी महिलांना रोखले.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घर काम करणाऱ्या महिलांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ...

हेही वाचा...शालेय शिक्षण मंत्र्यांचा हट्ट; १५ जूनपासूनच सुरू करणार ऑनलाईन शाळा

सध्या या परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांसह राज्यातील इतर भागातील महिलांवर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मुलुंडच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांनी अखेर रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला. या महिलांनी पालिकेच्या 'टी प्रभागा'च्या दिशेने मोर्चा काढला होता. परंतु, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत या महिलांना समजावून सांगितले आणि त्यांना मागे परतावून लावले. परंतु, अचानक शेकडो महिला रस्त्यावर उतरल्यामुळे या परिसरात एकच गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगला मात्र हरताळ फासला गेल्याचे दिसून आले.

हेही वाचा...कोरोनाशी लढण्यासाठी आयुर्वेदिक-होमिओपॅथी-युनानी उपचारांचा मार्ग मोकळा

'आमच्या इंदिरा नगरमध्ये घर काम करणाऱ्या अनेक महिला आहेत. हाताला काम नसल्यामुळे सगळ्याच्या घरातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे नियमात आणखी शिथिलता आणत आम्हाला देखील कामावर जाण्याची परवानगी दिली पाहिजे' अशी मागणी यावेळी घरकाम करणाऱ्या महिला कामगारांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details