मुंबई -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. लॉकडाऊन कोणालाच नको आहे. लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प होतात, नागरिकांचे नुकसान होते, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्या निर्बंधाची नियमावली थोड्याचवेळात मुख्यमंत्री सादर करतील अशी प्रतिक्रिया आज घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे