मुंबई -आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. रविवारी दिवसभरात धारावीत ६४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. धारावी प्रमाणेच दादरमध्ये ८३ तर माहिममध्ये ९८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६० ते ७० वर घसरलेली संख्या ४९५ वर पोहचली आहे. दादरमध्ये ६९४ तर माहिममध्ये ८४० अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
धारावीत ४९५ अॅक्टिव्ह रुग्ण -
कोरोना धारावीतून हद्दपार होणार, अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या २८ मार्च रोजी ६९२३ वर पोहचली आहे. धारावीतही काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. आज धारावीत ६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत एकूण ४८३४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४०२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
माहिममध्ये ८४० अॅक्टिव्ह रुग्ण -