मुंबई मेट्रोमध्ये कोरोनाचा शिरकाव.. ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - मुंबई मेट्रोमधील कामगारांना कोरोना
मुंबई मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु असून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कामात कोरोनाने अडथळा आणला आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) कार्यालयातील ६८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बाधित कर्मचाऱ्यांमध्ये एमएमआरसीएल वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ कर्मचारी या सर्वांचा समावेश आहे.
मुंबई - सध्या मुंबई मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु असून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कामात कोरोनाने अडथळा आणला आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) कार्यालयातील ६८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बाधित कर्मचाऱ्यांमध्ये एमएमआरसीएल वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ कर्मचारी या सर्वांचा समावेश आहे.
३५० कर्मचाऱ्यांची केली होती चाचणी -
मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने पसरू लागला असून अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात याचा संसर्ग होताना पाहायला मिळत आहे. डॉक्टर्स, रेल्वे कर्मचारी,पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) कार्यालयात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. एमएमआरसीएलमधील ३५० कर्मचाऱ्यांची ६ जानेवारीला कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामधील ६८ जण बाधित झाल्याचे समोर आले आहे. बाधितांमध्ये वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ कर्मचारी या सर्वांचा समावेश आहे.
कोरोना चाचणीला प्रोत्साहन -
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) दिलेल्या माहितीनुसार, 'एमएमआरसीएल'ने बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. तसेच इतरव्याधीग्रस्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना घरूनच काम करण्याचे आदेश दिले आहे. लक्षणे नसलेल्या आणि जवळच्या संपर्कात नसलेल्या कर्मचाऱ्यांना स्वत:ची चाचणी/आरटीपीएसीआर चाचणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. कोरोना चाचणीचा अहवाल दिलेल्या सर्वांना कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.