महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिंताजनक! कोरोनाबरोबर 'म्यूकरमायकोसिस'चे संकट गडद; सात जणांनी गमावले डोळे - Mucormycosis latest news

महाराष्ट्र कॊरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. अशात आता कॊरोनाच्या जोडीला घातक अशा 'म्यूकरमायकोसिस' आजाराचे संकटही गडद होऊ लागले आहे. कॊरोनामुक्त झालेल्या मधुमेही आणि इतर सहव्याधी असलेल्या रुग्णांना या आजाराची आता मोठ्या प्रमाणात लागण होत आहे.

Mucormycosis
संग्रहित फोटो

By

Published : May 8, 2021, 4:41 PM IST

Updated : May 8, 2021, 5:35 PM IST

मुंबई -मागील सव्वा वर्षांपासून मुंबई, महाराष्ट्र कॊरोनाच्या संकटाशी सामना करत आहेत. अशात आता कॊरोनाच्या जोडीला घातक अशा 'म्यूकरमायकोसिस' आजाराचे संकटही गडद होऊ लागले आहे. कॊरोनामुक्त झालेल्या मधुमेही आणि इतर सहव्याधी असलेल्या रुग्णांना या आजाराची आता मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या केईएम रुग्णालयात आजच्या घडीला 26 तर परळ ग्लोबल रुग्णालयात 25 रुग्ण दाखल झाले आहेत. या दोन्ही रुग्णालयातील एकूण सात रुग्णांनी डोळे गमावले आहेत. तर ग्लोबलमधील दोन रुग्णांची टाळू काढावी लागली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आता राज्य सरकारने, कोविड टास्क फोर्सने तातडीने या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याची माहिती ग्लोबल रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ मिलिंद नवलाखे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

इन्व्हेझिव्ह बुरशी ठरतेय घातक

म्यूकरमायकोसिस हा एक जंतुसंसर्ग, बुरशीजन्य आजार आहे. हा आजार जुना असून दोन प्रकारच्या बुरशी असते. ही बुरशी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या कॊरोनामुक्त रुग्णांच्या नाकात जाते. पुढे कान, डोळे आणि मग मेंदूपर्यंत जाऊन सर्वत्र संसर्ग पसरवते. तेव्हा वेळीच पहिली लक्षणे आल्या बरोबर अर्थात नाक सुजणे, सायनसचा त्रास, डोळे लाल होणे असे लक्षणे आल्या बरोबर डॉक्टराकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा रुग्णांना डोळे, नाक, टाळू गमवावी लागतेच. पण उपचारासाठी थोडाही उशिर झाला तर मेंदूवर घातक परिमाण होऊन जीव जातो. कारण या आजाराचा मृत्यूदर 50 टक्के असल्याचे डॉ नवलाखे सांगतात. त्याचवेळी म्युकर बुरशीचे इन्व्हेझिव्ह आणि सुपरफिशियल असे दोन प्रकार आहेत. सुपरफिशियल बुरशी तितकी घातक नसते. ती शस्त्रक्रिया करत काढता येते. पण आता रुग्णांना इन्व्हेझिव्ह बुरशीचा संसर्ग मोठ्या संख्येने होत असून ही बुरशी सर्वाधिक घातक असल्याची माहिती डॉ हेतल मारफातिया, नाक-कान-घसा विभाग प्रमुख, केईएम हॉस्पिटल यांनी दिली आहे. ही बुरशी नाकात जाऊन डोळे, नाक, घसा, टाळू, मेंदूवर दुष्परिणाम करत आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

आता दिवसाला 8 ते 10 रुग्ण? हा आजार जुना असून कॊरोना आधी वर्षाला 8 ते 10 रुग्ण केईएममध्ये उपचारासाठी दाखल होत होते. पण आता दिवसाला 5 ते 7 रुग्ण येत असल्याची माहिती डॉ हेतल यांनी दिली आहे. तर डॉ नवलाखे यांनी ही आता या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सद्या केईएममध्ये 26 तर ग्लोबलमध्ये 25 रुग्ण दाखल असून हे सर्व रुग्ण गंभीर आहेत. केईएममधील 10 रुग्णांच्या मेंदूला गंभीर इजा झाली आहे. तर 5 जणांचे डोळे गेले आहेत. 5 पैकी 3 मध्ये एक डोळा तर 2 मध्ये दोन्ही डोळे गेल्याचे डॉ हेतल यांनी सांगितले आहे. तर ग्लोबलमधील 2 जणांचे डोळे गेले असून 6 जणांची टाळू गेल्याचे डॉ नवलाखे यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे कॊरोना आधी 40 वर्षावरील रुग्ण यायचे पण आता तरुण 20 ते 35 वर्षाचे तरुण अधिक आहेत. तर मी पहिल्यांदाच आता 11वर्षांच्या मुलीवर उपचार केले आहेत. कधी लहान मुलांना हा आजार झाला नव्हता असेही डॉ हेतल यांनी सांगत या आजाराचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. मात्र त्याचवेळी अजून एकही मृत्यु मुंबईत झाला नाही ही दिलासादायक बाब आहे.

हेही वाचा -..तर कोरोनाची परिस्थिती गंभीर होईल, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

शुगर नियंत्रित ठेवा, जंगफूड टाळा

म्यूकरमायकोसिस हा आजार मुखत्वे मधुमेहीना होतो. अशात या आजाराच्या आकडेवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कॊरोनामुक्त मधुमेही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन म्युकर बुरशी नाकात जाऊन आजार बळावत आहे. अशावेळी आता कॊरोना मुक्त रुग्ण असो वा कॊरोना न झालेला मधुमेही रुग्ण असो त्यांनी शुगर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. तर मधुमेह होऊ नये याची काळजी प्रत्येकानी घ्यावी. जंक फूड टाळा, व्यायाम करा आणि पोषक आहार घ्या असा सल्ला डॉ हेतल यांनी दिला आहे.

उपचार महाग!

म्यूकरमायकोसिस घातक आहे. तर हा आजारावरील उपचार खूपच महाग आहे. औषधापासून ते यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री ही महाग आहे. रुग्णांना एक ते दीड महिने रुग्णालयात राहवे लागते. कधी कधी दिवसाला 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो. एकूणच लाखो रुपये खर्च येत आहे. अशावेळी रुग्ण वाढत असून गरीब रुग्ण इतका खर्च कसा करणार असा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने या आजाराकडे गंभीरपणे लक्ष देत पोस्ट कोविड मध्येच या आजाराला रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. तर आजारावर उपचार करण्यासाठी तसेच इतर उपाययोजना करण्यासाठी आता पाऊल उचलावे अशी मागणी डॉ नवलाखे यांनी केली आहे.

हेही वाचा -मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली उपसमितीची महत्वाची बैठक

Last Updated : May 8, 2021, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details