महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धारावीतील कोरोनाला एक वर्ष पूर्ण, आतापर्यंत ५ हजार रुग्णांची नोंद, ६९४ सक्रिय रुग्ण - धारावीतील कोरोनाला एक वर्ष पूर्ण

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.

Corona in Dharavi
धारावीतील कोरोना

By

Published : Apr 2, 2021, 8:27 PM IST

मुंबई -आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. धारावीतील कोरोनाला आज एक वर्ष पूर्ण झालं. आज धारावीत 73 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत एकूण 5 हजार 58 रुग्णांची नोंद झाली आहे.

धारावीत ६९४ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या २८ मार्च रोजी ६९२३ तर १ एप्रिल रोजी ८६४६ वर पोहचली आहे. धारावीतही काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. आज धारावीत ७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत एकूण ५०५८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४०४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ६९४ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा -18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची गरज - पटोले

माहिममध्ये ११८३ सक्रिय रुग्ण -

मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या हद्दीत धारावी, दादर, माहीम हे विभाग येतात. धारावी प्रमाणेच दादर आणि माहिममध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. दादरमध्ये आज १०० तर आतापर्यंत ६२८४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५०९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असुन १०२० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये आज १२० रुग्ण तर आतापर्यंत ६४०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५०६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११८३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावीत सहावेळा शून्य रुग्ण -

मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालय यामुळे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. धारावीत १ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चार टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. जुलै ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या एक अंकावर आली होती. २४ डिसेंबर, २२ जानेवारी, २६ जानेवारी, २७ जानेवारी, ३१ जानेवारी, २ फेब्रुबारी या सहा दिवसात धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा -चिंताजनक! मुंबईत महिनाभरात कोरोनाचे ४६ हजार सक्रिय रुग्ण वाढले

ABOUT THE AUTHOR

...view details